परभणी जिल्हा पोलिस दलात भुकंप; 8 कर्मचाऱ्यांचे सेवेतून निलंबन..
परभणी जिल्हा पोलिस दलात भुकंप; 8 कर्मचाऱ्यांचे सेवेतून निलंबन..
पोलिस अधीक्षक जयंत मीना यांचे आदेश
परभणी/प्रतिनिधी
पो.अ.जयंत मीना यांनी परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची सुत्रे स्विकारल्या नंतर जिल्ह्यात अवैध धंद्याची साफसफाई करण्याची मोठी मोहीम हाती घेतली आहे. मागील तीन काळात एका पाठोपाठ एक धडाकेबाज कार्यवाही करत अवैध धंदे चालकांचे अक्षरशः धाबे दणाणून सोडले आहेत. त्यांनी यापुढे जाऊन एक पाऊल पुढे टाकत या अवैध धंदे वाल्यांशी जवळीक साधुन आपले खिसे गरम करणारे, अवैध धंद्याकरिता पाठराखण करणा-या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील फैलावर घेत एका मागोमाग निलंबन करण्याचा सपाटा लावला आहे. रविवारी ३१ रोजी सेलु,पुर्णा,मानवत, येथिल तीन कर्मचा-यांचे निलंबन केल्याचे आदेश दिले असतानाच पुन्हा मंगळवारी २ फेब्रु रोजी जिल्हा पोलीस दलातील 8 कर्मचार्यांना सेवेतून निलंबित केले आहे.
सदरील पोलीस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात बेशीस्त, बेजबाबदार, नैतीक अध:पतनाचे वर्तन तसेच लाचखोर वृत्तीचे वर्तन केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने व अवैध धंदे करणार्या व्यावसायिकांशी संबंध साधून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेणे, तसेच अवैध वाळू वाहतुक करणार्यांकडून देखील अवैधरित्या पैसे वसुल करतात व पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याच्या कारणावरून 8 पोलीस अंमलदारांना कर्तव्यातून निलंबीत करण्यात आले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
हे आहेत निलंबित कर्मचारी…
पोह वैजनाथ माणिकराव आदोडे, पोना मा.मोसीन मो.मोईर्नें सपोउपनि गजानन रामभाऊ जंत्रे (तिघे नेमणूक- कोतवाली ठाणे), पोशि सुर्यकांत अंकुशराव सातपुते, पोह विठ्ठल पंडीतराव कटारे (दोघे नेमणूक-नवामोंढा ठाणे), चापोशि सचिन शिवाजी राखोंडे, पोना सतिश पांडुरंग कांबळे (नेमणूक-नानलपेठ ठाणे) आणि चापोशि कृष्णा बबनराव शिंदे (नेमणूक- गंगाखेड ठाणे-संलग्न मोपवि)