स्था.गु.शाखेच्या पोलिसांची दबंग कार्यवाई;टिप्पर चोर टोळीचा केला पर्दाफाश
परभणी;पो.नि.अशोक घोरबांड यांच्या पथकची धडाकेबाज कारवाई;चोरी गेलेल्या टिप्परसह चौघांना घेतले ताब्यात
परभणी(प्रतिनिधी)
परभणी पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या सिंगम फेम पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या नेतृत्वाखाली मागील काही महिन्यांपासून अवैध धंद्यावरील छापेमारी,महीला छेडछाड,खुन,दुचाकी चोरीसह,एका पाठोपाठ दबंग कार्यवाई करत परभणी पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.कार्यवाईंचे सत्र सुरूच आहे.
पूर्णा तालुक्यातील चुडावा हद्दीतील मौजे सारंगी येथून चोरी झालेल्या एका टिप्परच्या शोध घेत टिप्पर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफास देखील केला आहे. दोन ते अडीच महिन्यापुर्वी पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलिस हद्दीतील धनगर टाकळी येथून शरद किशनराव जोगदंड रा.सारंगी ता.पूर्णा यांचा टिप्पर क्र एम.एच.४८/टि.आर/ ९४२०१४चोरीला गेला होता.याप्रकरणी चुडावा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल होऊन तपासात म्हणावा तशी प्रगती होत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सदरील तपास स्थागुशाचे पोनि.अशोक घोरबांड यांच्या कडे सोपवला. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी ,अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ .समाधान पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थान.गु.शाखेचे पो.नि. अशोक घोरबांड सपोनि.पी.डी. भारती, पोउपनि चंदनसिंह परीहार, पोलीस अंमलदार रंगनाथ दुधाटे,सचिन भदरगे, राहूल परसोडे,लक्ष्मण कागणे,हनुमान ढगे,दिलीप निलपत्रेवार,परसराम गायकवाड,उत्तम हनवते,सायबर सेलचे पोलीस अंमलदार मोहम्मद शारेक, गणेश कौटकर यांच्या पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवून तपास करत चोरी गेलेल्या टिप्पर चोरांचा छडा लावला.पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील शेख सलीम, बापुराव डुकरे, निखिल ढगे यांनी टिप्पर चोरी केल्याचे निष्पन्न होताच तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी लातुर शेख जमील, शेख गुलाब याला वाहन विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी सदर वाहन जप्त केले असून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.सदरील वाहन व चोरट्यांना पथकाने पुढील कारवाईसाठी चुडवा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
सदर पथकाच्या धडाकेबाज कामगिरी बद्दल सर्वांचे कौतुक केले जात आहे.