परभणी;सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला समोर; मृत्यूमागील धक्कादायक कारण झालं उघड.

Spread the love

परभणी(प्रतिनिधी)
परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या शवविच्छेदनाचा अवहाल समोर आला आहे.त्याचा मृत्यू अनेक जखमांनंतर लागलेला धक्का (Shock following multiple injuries) यामुळे झाल्याचे डॉक्टरांनी केलेल्या ईनकॅमेरा शवविच्छेदनानंतर उघडकीस आले आहे.यावरुन विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परभणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
    परभणीत १० डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड व विटंबना झाल्याच्या घटनेनंतर हिंसाचाराची घटना घडली होती.दरम्यान घटनेप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी याचा रविवारी १५ रोजी पहाटे कारागृहात मृत्यू झाला होता.त्याच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली होती.अनुयायांसह अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला,असा आरोप करण्यात आला होता.मात्र, पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले होते.याठिकाणीही शवविच्छेदनाला उशीर होत असल्याने आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले होते.अखेर सोमवारी दुपारच्या सुमारास घाटी रुग्णालयात सोमनाथ सूर्यवंशीचे इन कॅमेरा मृतदेह शवविच्छेदन करण्यात आले.  शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आता समोर आला आहे. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूचे कारण अनेक जखमांनंतर लागलेला धक्का (Shock following multiple injuries) असे नमूद करण्यात आले आहे. तसेच प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंगावर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरुन विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परभणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

You cannot copy content of this page