Vijay Wakode Death : आंबेडकरी चळवळीती योद्धा काळाच्या पडद्याआड; लोकनेते विजय वाकोडे यांचं निधन
परभणीत शोककळा;मंगळवारी होणार अंतिम संस्कार
परभणी(प्रतिनिधी)
भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व विजय वाकोडे यांचे सोमवारी (दि.१६) रात्री र्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६३ वर्षांचे होते. या घटनेने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.परभणीत शोककळा पसरली असून,मंगळवारी अंतिम संस्कार होणार असल्याचे समजते.
परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तीकेच्या प्रतिकृतीची तोडफोड झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेत ताब्यात घेतलेल्या आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली.त्या मारहाणीत न्यायालयीन कोठडीत कारागृहात असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचे रविवारी निधन झाले होते.निधनानंतर वाकोडे यांनी आक्रमक भूमिका घेवून मृतदेहाचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगरला करावे, अशी मागणी केली होती. तसेच आज सोमवारी दिवसभर पुकारलेल्या राजव्यापी बंदच्या दरम्यान येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात ते ठाण मांडून वाकोडे यांनी या घटनेत न्यायालयनीय चौकशी करावी अशी मागणी केली. परभणी येथे सायंकाळी ६:३० वाजता सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीत यात्रेत तसेच अंत्यसंस्कारात सहभाग नोंदवून ते घरी परतत असतांना प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने कार्यकर्त्याच्या मदतीने वाकोडे यांनी एका खाजगी रुग्णालयात धाव घेतली, परंतु उपचार सुरू असतांनाच त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, अशी माहिती हाती आली आहे. दरम्यान, वाकोडे यांच्या निधनाच्या वृत्ताने आंबेडकरी चळवळीसह सर्व क्षेत्रातील नागरीकांना मोठा धक्का बसला आहे.