Parbhani परभणी शितलहर;हुडहुडीने जनजीवन विस्कळित
तापमान ४.१ अंशवर;जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या; उबदार कपड्यांना पसंती
परभणी(प्रतिनिधी)
मागील काही दिवसांपासून उत्तरेकडुन येणाऱ्या थंड वा-यामुळे परभणी जिल्ह्यात शितलहरीने थैमान घातले आहे.जिल्हाचा पारा ४अंशावर आला आहे.यामुळे जनजीवन विस्कळित झाले असून,थंडी पासून बचाव करण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटल्या असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्याचे किमान तापमान पेक्षा ५ अंशाने कमी नोंदविल्या गेले आहे.
देशात उत्तरेकडील राज्यांत मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे.त्याचा परीणाम म्हणून देशातील अनेक राज्यांत शितलहर निर्माण झाली आहे. सरासरी डिसेंबर महिन्यात किमान तापमान ९ अंश सेल्सीअस एवढे असते मात्र शितलहरीने जिल्ह्याचा पारा ५ अशांच्या खाली घसरला आहे.जिल्ह्यात सध्या मागील तीन दिवसांपासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात रेकार्डब्रेक किमान तापमान ४.१ अंश सेल्सीअस इतके नोंदविले गेले आहे तापमानात घट झाल्याने त्यांना सर्वत्र हुडहुडी वाढली आहे. सकाळ, सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. वाढत्या थंडीमुळे दैनंदिन जनजीवनावरही परिणाम झाला आहे. सकाळची कामे उशिरा होत आहेत. थंडीमुळे सकाळी लवकर घराबाहेर पडण्याचे टाळल्या जात आहे. दिवसभर अंगामध्ये स्वेटर घालण्याची वेळ आली आहे. सायंकाळच्या वेळी देखील नागरीक लवकर आपआपल्या घरात जात आहेत.दिवसाचे कमाल तापमानही कमी झाले आहे. मंगळवारी कमाल तापमान २७ अंश सेल्सीअस एवढे नोंदविल्या गेले. सरासरी पेक्षा हे तापमान दिड अंशाने कमी आहे.शहर व ग्रामीण भागातील जनजीवन थंडीमुळे विस्कळित झाले असून, नागरिकांनी या थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरावेत, कडाक्याच्या थंडीत पहाटेचा मार्गिंग वाॅक टाळावा,गरम अन्न खावे असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.