परभणी;पाथरी तालुक्यात गॅस सिलेंडरचा स्फोट
घर जळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली
परभणी(प्रतिनिधी)
परभणी/पाथरी : जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील बोरगव्हाण येथे एका घरगुती गॅस सिलेंडरचा सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील संसार उपयोगी साहित्यासह,दाग- दागिने तसेच घरातील साहित्य जळून खाक झाले झाल्याची घटना मंगळवार १७ डिसेंबर रोजी दुपाारच्या वेळी घडल्याचे उघडकीस आले आहे.सुदैवाने घरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथिल शामराव खुडे यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्पोट झाला आहे .मंगळवारी घरातील सर्व कुटुंबीय दुपारच्या वेळी घरास कुलूप लावून शेतात गेले होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला.यामुळे घरावरील सर्व लोखंडी पत्रे यावेळी उडून गेली यामुळे गावात एकच खळबळ उडाली नेमकं झाले तरी काय हे समजत नव्हते नंतर गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचे दिसून आले.ग्रामस्थांनी कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली.कुटुंबीय घटनास्थळी पोहचेपर्यंत ग्रामस्थांनी आग विझवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आगीचा भडका जास्त प्रमाणात असल्याने अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले.आग आटोक्यात येईपर्यंत घराला लागलेल्या आगीमध्ये घरातील दाग दागीन्यासह , अन्नधान्य सर्व संसार उपयोगी साहित्य जळून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.यावेळी घरात कोणीही नसल्याने सुदैवानं या स्फोटामध्ये जीवित टळली.