Parbhaniपरभणीचे आ.डॉ.राहुल पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
सोमनाथ सूर्यवंशी(somnath suryawanshi)यांच्या मृत्यूची CBI चौकशी करुन त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची केली मागणी
परभणी(प्रतिनिधी)
परभणी शिवसेना उद्धव ठाकरे(udhav thakray)गटाचे आ.डॉ.राहुल पाटील(Mla Dr.Rahul Patil) यांनी नागपूर(Nagpur)येथे नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadavnis)यांची भेट घेऊन परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या मृत्यूची CBI चौकशी करुन त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची केली मागणी केली आहे.
परभणी शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना काही व्यक्तीकडून करण्यात आली. सदरील घटनेनंतर दुसऱ्या दिवशी संविधान प्रेमीकडून आंदोलन करण्यात आले व परभणी शहर बंद पुकारण्यात आला. त्यावेळी आंदोलनाच्या दरम्यान दगडफेक झाल्यामुळे पोलिसांनी(Police)आंदोलकांवर लाठीचार्ज केला व कांही आंदोलकांना अटक करण्यात आली.सदरील पोलीस कारवाईमध्ये कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या श्री. सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या युवका अटक करण्यात आले. पोलिसांच्या कारवाईमध्ये सदर युवकाला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला व त्याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला झाला. ही बाब अत्यंत गंभीर असून त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात पडत आहेत.त्यामुळे आपण यासर्व प्रकरणाची सीबीआय(CBI)मार्फत चौकशी करावी. तसेच मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबियांना तातडीची ५० लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून करण्यात यावी तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस कायमस्वरूपी सरकारी सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.