चोरट्यांनी SBI बँकेचे एटीएम फोडले..

Spread the love

चोरट्यांनी SBI बँकेचे एटीएम फोडले..
परभणीच्या क्रांतीचौकातील घटना;12 हजार 500 रुपये लंपास;नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ..
परभणी/ प्रतिनिधी
परभणी शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या क्रांतीचौकातील एसबीआय बँक शाखेच्या एटीएमला अज्ञात चोरट्यांनी लक्ष बनवित एटीम फोडुन त्यातील १२ हजार ५०० रुपये चोरून नेत पोलीसांसमोर आवहान उभे केले आहे.
या प्रकरणी बुधवारी ३ रोजी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,प्रकरणी अंकुश हुलेकर यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे, की आपण ईपीएस या कंपनीत चॅनल मॅनेजर म्हणून कार्यरत असून शहरातील बँकांच्या एटीएमवर मोबाईल अ‍ॅप्लीकेशनव्दारे देखरेख ठेवत असतो. मंगळवारी (दि.२ फेब्रुवारी रोजी) रात्री १२:३० वाजेच्या सुमारास आपल्या अ‍ॅप्लीकेशनमध्ये एक कॉल दिसला. त्यात क्रांतीचौकातील एटीएममध्ये कॅश हँडलर नावाचा एरर आला. त्यावरून एटीएममध्ये कॅश टाकणार्‍या व्यक्तींना आपण तो येरर पाठवला. त्यावेळी आनंद बाळशंकर, विशाल बेंडे यांनी एटीएममध्ये जाऊन पाहिले असता मशीनला एरर असल्याचे सांगितले. त्यावेळी आपण तेथे जाऊन पाहिले असता एटीएम नादुरूस्त झाल्याचे दिसले. त्यामुळे एटीएममधील रक्कम मोजली. त्यावेळी 21 लाख 39 हजार रुपयांपैकी 21 लाख 26 हजार 500 रुपये एवढी रक्कम एटीएममध्ये आढळली. त्यात 12 हजार 500 रुपये कमी असल्याचे दिसून आले. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने क्रांतीचौकातील एसबीआय बँकेच्या एटीम फोडून 12 हजार 500 रुपये रक्कम लांबवल्याचे म्हटले आहे.
हुलेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी श्री.लटपटे अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page