पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ;खा. संजय जाधव,खा. फौजिया खान यांची उपस्थिती
परभणी(प्रतिनिधी)
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मानवत तालुक्यातील सरहद्द करंजी ते देवलगांव तसेच पाथरी तालुक्यातील लोणी ते कानसूर वस्ती या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खासदार संजय जाधव व खासदार श्रीमती फौजिया खान यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार 8 एप्रिल रोजी करण्यात आला.
मानवत तालुक्यातील सरहद्द करंजी, खरबारुढी, आंबेगाव व देऊलगांव आवचार या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी 3 कोटी 27 लाख 24 हजार रुपये तर लोणी बु., कानसुर ते कानसूर वस्ती या रस्त्याच्या सुधारणा कामाकरीता 5 कोटी 24 लाख 93 हजार रुपये मंजूर झाले आहेत. या दोन्ही रस्त्यामुळे त्या भागातील ग्रामस्थांना सुखकर, सुरक्षित आणि सोयीचा असा प्रवास होणार आहे. हा रस्ता फक्त दळणवळासाठी नाही तर गावच्या प्रगतीचा मार्ग ठरवणारा आहे, अशी प्रतिक्रिया या खासदार महोदयांनी व्यक्त केली.












