“हिम्मत शाळे”तुन मिळणार नापास विद्यार्थ्याना शिक्षण
परभणी(प्रतिनिधी)
आयोध्या एज्युकेशन अँड सोशल डेव्हलपमेंट ट्रस्ट व मराठवाडा कलाग्राम परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नापास झालेल्या विद्यार्थ्यां साठी हिम्मत शाळा आयोजन करण्यात आले आहे असे आव्हान अँड .आनंद कदम यांनी पत्रकार द्वारे कळविली आहेसदरील हिम्मत शाळेचे आयोजन मराठवाडा कलाग्राम वर्मा नगर येथे दिनांक ०५ मे पासून करण्यात आले असून या हिम्मत शाळेत नापास झालो म्हणजे आयुष्य संपत नाही हा उद्देश समोर ठेवून नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पण काहीतरी करू शकतो आपल्या मधील स्किल यांना चालना देऊन प्रगती करता येते यात प्रामुख्याने मीही काहीतरी करू शकतो या उद्देशाने प्रेरित होऊन विविध खेळाचे कबड्डी क्रिकेट ॲथलेटिक गुण अंगीकारणे कला क्षेत्रातील छंद जोपासणे हस्तकला विणकाम शिवणकाम पट्टी भरणे पुट्टी प्लेट तयार करणे आदी कला आत्मसात करून मीही काय करू शकतो हे दाखवून देणे विविध तज्ञ मार्गदर्शनाच्या वतीने विद्यार्थ्यांना कौन्सलिंग करणे त्याचा कल पाहणे व त्या क्षेत्रात यश संपादन कशी करता येईल यासाठी मार्गदर्शन करणार आहे विविध गुणदर्शनाच्या माध्यमातून कला जोपासणे याही बाबीकडे लक्ष दिले जाणार आहे या माध्यमातून मुक्त विद्यापीठा तील शिक्षण यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे स्वयंरोजगार स्किल निर्माण व्हावी याकरिता मार्गदर्शन करण्यात येणार आहे नापास झालेल्या विद्यार्थी जास्तीत जास्त संख्येने आपली नोंदणी करून या सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी संपर्क… मराठवाडा कलाग्राम सुमनताई गव्हाणे विद्यालयाजवळ वर्मा नगर परभणी येथे संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे mob no… 7506351415..9860382076 संपर्क साधावा