जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाकडून गुणवंत विद्यार्थींनी सायली राजुरे हिचा गौरव
जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी,सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा गौरव कार्यक्रम संपन्न
परभणी ता.४ (प्रतिनिधी)
परभणी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने गुरुवार ३ जुलै रोजी शहरातील श्री मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सेवा गौरव सोहळा पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाचे अध्यक्ष गणेश शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी तेजराव काळे, दत्तात्रय राऊत, मनोत भातलवंडे, देविदास उमाटे, बालासाहेब भांगे यांची उपस्थिती होती. परभणी, सेलू, मानवत,पाथरी, जिंतूर, पालम, पूर्णा, गंगाखेड आदीं शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी गोकुळात विद्यालयाची सायली सुभाष राजुरे हिचा तीच्या पालकांसह गौरव करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीते साठी शिवाजी पाचकोर, दुर्गा देशमुख, जया जाधव, सदाशिव मुंढे, देवानंद अंभुरे, दिगंबर मोरे, बालाजी पौळ, शेख सगीर, राजकुमार धबडे आदींनी परिश्रम घेतले.












