गंगाखेडच्या व्यापा-यास लुटणाऱ्या चोरट्यांना पुण्यात पकडले..
गंगाखेडच्या व्यापा-यास लुटणाऱ्या चोरट्यांना पुण्यात पकडले..
परभणीच्या स्था.गु.शाखेची कार्यवाही नगदी रोकडसह पिस्तूल जप्त..
परभणी/प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरातील एका सुपरशाॅपी चालवणा-या व्यापा-यास लुटल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी रात्री घटली होती.या घटनेतील फरार चोरट्यांना परभणी पोलीसांच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पुणे येथुन पकडून जेरबंद करीत त्यांच्याकडुन रोख रकमेसह एक पिस्तूल आदीं २ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गंगाखेड बाजारपेठेतील सुपरशाॅपीचे मालक कुणाल यानपल्लेवार हे मंगळवार ता.२ रोजी रात्री साडे नऊ वाजता आपले दुकान बंद करून घराकडे जात असताना त्यांना तीन ते चार जणांनी अडवून मारहाण करीत त्यांच्याकडील असलेली पैशाची बँक हिसाकावुन नेल्याची घटना घडली होती.याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरनं ४८/२१कलम ३९५,३४ नुसार १ लाख ९५ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे होता.सदरील घटनेतील चोरट्यांच्या शोधाकरीता स्थानिक गुन्हा शाखेवर जबाबदारी सोपविण्यात आली होती.स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकातील सपोनि.आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय साईनाथ पुयड, हनुमान जक्केवाड, सोनवणे,तुपसंमिंदरे, चव्हाण,घुगे,निळे आदींच्या पथकाने सदरील घटनेतील चोरटे पुणे शहरात असल्याची माहिती मिळवली या माहीतीच्या आधारे पुणे शहर गाढले पथकाने अर्जुन बडवणे, किशोर भोसले,साहील सुंदराव उर्फ राजेश जाधव सर्व राहणार खडकपुरा गल्ली गंगाखेड यांना ताब्यात घेत जेरबंद करत त्यांच्या कडुन रोख रकमेसह एक पिस्तूल आदीं २ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.












