Parbhaniइज्तेमामुळे वाहतूकीत बदल पर्यायी रस्ता वापरावा-पो.अ.परदेशी यांचं आवहान

Spread the love

परभणी(प्रतिनिधी)
(Parbhani)शहरात जिंतूर रस्त्यावरील होत असलेल्या इज्तेमासाठी (ijtemta)परभणी,हिंगोली जिल्ह्यातून  लाखों मुस्लिम बांधव हजेरी लावणार आहेत.प्रसंगी शहरातील  जिंतूर रोडवर वाहतूक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळे पोलिसांनी २ जानेवारी रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांची रहदारी बंद केली असल्याचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी (Superintendent of Police RavindraSing Pardesi)यांनी सांगितले आहे.जिंतूर अधिसूचना काढली आहे.
  परभणी येथे दि.१ व २ जानेवारी रोजी मुस्लिम समाजाचा तब्लिगी इज्तेमा होणार आहे.या कार्यक्रमास परभणी व हिंगोली (Parbhani, Hingoli)जिल्ह्यातील सुमारे दोन ते अडीच लाख मुस्लिम बांधव हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे.शहरात बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परभणी पोलीसांनी २ जानेवारी रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूकीत बदल केले आहेत.जिंतुरकडून(JinturRoad) परभणी शहराकडे येणारी अवजड . वाहने, पाथरी(Pathari Road) रोडने परभणी शहराकडे येणारी अवजड वाहने, गंगाखेडकडून सिंगणापुर फाटा येथून परभणी शहरातून येऊन जिंतूर किंवा पाथरीकडे जाणारी अवजड वाहने, वसमतकडून वसमत(Basmat Road)रोडने पाथरी व जिंतुरकडे जाणारी यांच्यासाठी अवजड वाहने रहदारीकरीता रस्ता बंद करण्यात आला आहे. पर्यायी रस्ता, वळण रस्त्याच्या वापराबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पाथरी रोडकडून येणाऱ्या वाहनांनी मानवत पाथरी उमरी फाटा या रस्त्याचा वापर करावा. गंगाखेडकडून सिंगणापुर फाटा मार्गे परभणी शहरात येऊन जिंतूर किंवा मंठा व मानवतकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांनी परभणी शहरात न येता उमरी फाटा पाथरी ,मानवत देवगाव फाटा मार्गे जिंतुरकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा. जिंतूर शहरातून परभणीकडे येणाऱ्या अवजड वाहनांनी कौसडी फाटा वालूर- मानवत (walur-manvat road)पाथरी पोखर्णी फाटा – उमरी फाटा या मार्गाचा वापर करावा. तसेच जालना, मंठ्याकडून येणाऱ्या अवजड वाहनांनी देवगाव फाटा- सेलू मानवत पाथरी – पोखर्णी फाटा या रस्त्याचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

You cannot copy content of this page