Parbhani पालम शहरात विजेच्या धक्क्याने तिघांचा दुदैवी मृत्यू अन् तीघे गंभीर जखमी.

Spread the love

पालम शहरातील हृदयद्रावक घटना;पानटपरी हलवताना विद्युत वाहीनीला स्पर्श झाल्याने घडली घटना ; जखमींवर रोहा येथे उपचार

पालम ता.१४(प्रतिनिधी) : Electricity Shock News Palam परभणी जिल्ह्यातील पालम शहरातून एक हृदयद्रावक बातमी उघडकीस आली आहे. येथिल बालाजीनगर परिसरात रविवारी (ता.१४) रोजी सायं साडेपाच वाजता विजेचा शॉक लागून तीघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे उपचार सुरू असल्याचे समजते.घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सिद्धार्थ नरहरी वावळे (३५, रा. जवळा, ता. पालम), शेख शफीक शेख मुसा (३१) व शेख शौकत शेख मुसा (४०, रा. बालाजी नगर, पालम) असं त्या घटनेतील मयतांची नांवे आहेत.याबातीत अधिक माहिती अशी की,पालम शहरातील बालाजी नगर येथील शेख शफीक शेख मुसा (३१) यांची रोहा रस्त्यावर पानटपरी होती.ती बंद करून ती कायमची घराजवळ आणण्यासाठी त्यांनी रविवारी सायं ५:३० वाजेच्या सुमारास ती बैलगाडीत ठेवून घरा जवळ आणल्यानंतर बैलगाडीतून लोखंडी पानटपरी खाली घेत असताना ती टपरी मागील बाजूस घसरली यावेळी बैलगाडीवरील बैल जुंपण्यासाठीचे लोखंडी दांड्या वरुन गेलेल्या ११ केव्ही विजेच्या तारेला स्पर्श झाली. यात पानटपरीला पकडणारे सिद्धार्थ नरहरी वावळे शेख शफीक शेख मुसा व शेख शौकत शेख मुसा,तसेच शेख फरहान शेख महेबूब असेफ शेखेर शेख व शेख असलम यांना विजेचा तीव्र धक्का बसला.घटना घडताच तिघांना तत्काळ पालम रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून सिद्धार्थ नरहरी वावळे शेख शफीक शेख मुसा व शेख शौकत शेख मुसा मृत घोषित केले.तर या अपघातात शेख फरहान शेख महेबूब (१६), असेफ शेखेर शेख (१८) व शेख असलम शेख गुड्डू (रा. आयेशा कॉलनी, पालम) हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड जिल्ह्यातील लोहा येथिल साई हॉस्पिटल, येथे हलविण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पालम शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

You cannot copy content of this page