मौजे गुळखंड शिवारात पुरात अडकलेले दोघे शेतकरी सुखरूप बाहेर

Spread the love

परभणी, दि. 27 (प्रतिनिधी):
पालम तालुक्यातील मौजे गुळखंड शिवारात शनिवारी झालेल्या पुरामुळे शेतामध्ये अडकलेल्या दोन शेतकऱ्यांना बचाव पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.

अडकलेल्यांची नावे मारोती विठ्ठल बगाडेजगन्नाथ भगवान बगाडे अशी आहेत. ते शेतात काम करत असताना अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अडकले होते. माहिती मिळताच प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले व ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून दोघांना सुरक्षित स्थळी आणण्यात आले.

याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

You cannot copy content of this page