Parbhaniपंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित
परभणी जिल्ह्यातील ९ पैकी ३ पदे सर्वसाधारण तर ३ सर्वसाधारण महिलांसाठी
परभणी ता.१२ (प्रतिनिधी) :Panchayat Samiti Chairman Reservation News राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित केले आहे. त्यानुसार परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव ठरले असून, जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांपैकी सभापती पदांचे आरक्षण खालीलप्रमाणे ठरले आहे.
जिल्ह्यातील ९ सभापती पदांपैकी ३ पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी, ३ पदे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाली आहेत. याशिवाय अनुसूचित जाती (महिला) साठी १ पद, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी १ पद व मागास प्रवर्ग (महिला) साठी १ पद असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
ग्रामविकास मंत्रालयाचे सहसचिव व्ही. एम. भरोसे यांनी या संदर्भातील आरक्षण जाहीर केले. यानंतर आता परभणी जिल्हा महसूल प्रशासनाद्वारे पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे विशिष्ट आरक्षण शासनाच्या निर्देशानुसार लवकरच निश्चित करण्यात येणार आहे.या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली असून, पुढील निवडणुकांमध्ये या आरक्षणाचे राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे












