गोपनीय शाखेचे भगवान वाघमारे यांना फौजदारपदी पदोन्नती..

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)


परभणी पोलीस दलातील आणि जिल्हा विशेष गोपनीय शाखेअंतर्गत पूर्णा /चुडावा/पालम हद्दीत पोलीस अंमलदार पदावर कार्यरत असलेले भगवान नागोराव वाघमारे यांना फौजदारपदी पदोन्नती मिळाली आहे. याबाबत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे याबाबत दि.१० रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.विभागीय अर्हता परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांची  पोलीस उपनिरीक्षक गट ब अराजपत्रित पदावर निवड झाल्याने, त्यांची बदली  मुंबई राज्य गुप्त वार्ता विभागात करण्यात आली आहे.
       पोलीस अंमलदार भगवान वाघमारे यांनी जिल्हा विशेष गोपनीय शाखेत अनेक वर्षांपासून सेवा बजावली आहे.मागील‌ काही वर्षांपूर्वी पोलीस दलांतर्गत फौजदार गट ब अराजपत्रित पदांसाठी विभागीय अर्हता परीक्षा घेण्यात आली होती.यात जिल्ह्यातील अनेकांनी ही परिक्षा उत्तीर्ण केली.परंतु शासन निश्चितपणे सेवा ज्येष्ठतेनुसार रिक्त असलेल्या पदांवर पोलिस अंमलदार पदावर कार्यरत असलेले भगवान वाघमारे व अविनाश बनाटे यांना यावेळी (अराजपत्रित गट ब) फौजदार पदांवर पदोन्नती मिळाली आहे.पदोन्नतीने बढती मिळाल्यानंतर मुंबई राज्य गुप्त वार्ता विभागात रिक्त असलेल्या फौजदार पदांवर त्यांची बदली करण्यात आली आहे.
       याबात पोलीस महासंचालक यांच्या शुभेच्छा सह जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील,पूर्णा पो.नि.विलास गोबाडे,चुडावा ठाणेदार नरसिंह पोमनाळकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page