कोंबींग ऑपरेशन;३३ गुन्हेगारांसह ३५ हाँटेल३८५ वाहनांची झाडाझडती

Spread the love

परभणी जिल्हा पोलीस दलातर्फे ऑलआऊट ऑपरेशन दरम्यान कारवाई

परभणी (प्रतिनिधी)
परभणी जिल्हा पोलीस दलातर्फे मंगळवारी रात्री ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले.दरम्यान पोलीसांनी३३ गुन्हेगारांसह ३५ हाँटेल३८५ वाहनांची झाडाझडती घेतली.यात पोलीसांना एका गुन्ह्यात हवा असलेला एक आरोपी देखील पोलीसांनी ताब्यात घेतला आहे तर २४ अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलेले आहेत.
परभणी पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार मंगळवारी ता.२९ रोजीचे मध्यरात्री पासून पहाटे ५ वाजेपर्यंत कोंबींग ऑपरेशन करण्यात आले. दरम्यान ऑलआऊट ऑपरेशन मध्ये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी आणि ठाणेदार व स्था.गु.शा. चे सर्व अधिकारी व अंमलदारांनी सहभागी झाले होते.नाकाबंदी; १९ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली होती.
३६अधिकारी व ९७अंमलदार नेमण्यात आले होते.
कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ३५ हॉटेल व ३८५ वाहने तपासण्यात आलेली आहे.
तसेच कोंबींग ऑपरेशन दरम्यान ३३ गुन्हेगारांना तपासण्यात आले.
असून०१ पाहिजे असलेल्या गुन्हेगार देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे.सदर ऑपरेशन दरम्यान २४ अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलेले आहेत.
-३ तडीपार इसमांना तपासलेले आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे साहेबांचे नेतृत्वाखाली मध्ये सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी आणि ठाणेदार व स्था.गु.शा. चे सर्व अधिकारी व अंमलदारांनी यांनी मिळून केली आहे.

You cannot copy content of this page