बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ७७ जण जिल्हयातून हद्दपार
जिल्हयाच्या सिमेवर चेकपोस्ट केल्या कार्यान्वित
परभणी ता.६(प्रतिनिधी)
जिल्हयात यापूर्वी बकरी ईद गोवंश तस्करी आणि कत्तली संदर्भात बेकायदेशिर कृत्ये घडले आहेत. यंदाच्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा बसावा आणि जिल्हयात कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी यासाठी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत एकूण ७७ आरोपींना हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी शुक्रवारी (दि.६) काढले आहेत.
जिल्हयातील काही आरोपींच्या वर्तनामध्ये काहीएक सुधारणा झालेली नाही. या आरोपींकडून आगामी काळात सण उत्सोव दरम्यान गैरकायदेशिर कृत्य, गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जिल्हयात कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी, यासाठी अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात जिल्हयातील सर्व पोलिस ठाण्यात बकरी ईद संबंधात दाखल गुन्हयातील आरोपींना भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायद्यान्वये एकूण ७७ आरोपींना शुक्रवारी (दि.६) पासून येत्या रविवारी (दि. ६) या कालावधीत जिल्हयातून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सर्व सिमेवर चेकपोस्ट २४ तास कार्यान्वित करण्यात आले आहे. या दरम्यान प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी जनावरांच्या अवैध वाहतुकीच्या संदर्भाने कसून तपासणी करण्यात येत आहे.
सण, ऊत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण होईल असा मजकुर, चित्र अथवा व्हिडिओ आदींवर प्रशासनाची नजर असून अशा प्रकारच्या पोस्ट समाजमाध्यमांवर प्रसारीत करू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
_________________