पूर्णेत दस-याला ५१ फुटी रावणाचे दहन-शिवसेना शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम

Spread the love
पुर्णा ता.२७(प्रतिनिधी)
विजयादशमीच्या मुहूर्तावर पूर्णा शहरातील जुना मोंढा बाजार मैदानावर यंदा ५१ फुटी रावणाची प्रतिकृती दहन करण्यात येणार आहे. राजे संभाजी नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्याचे दहन परभणी जिल्ह्याचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती शिवसेना (उबाठा गटाचे) शहरप्रमुख व कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मुंजाभाऊ कदम यांनी दिली.
गेल्या १५ वर्षांपासून खासदार बंडू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा शहरात रावण दहनाचा सोहळा आणि भव्य आतषबाजीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदाही गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सायं. ८ वाजता हा सोहळा होणार आहे. या वेळी खासदार संजय जाधव यांच्यासह संपर्कप्रमुख सुधाकर खराटे, उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले, नगराध्यक्ष संतोष एकलारे, तालुका प्रमुख काशिनाथ काळबांडे, युवासेनेचे बंडुअप्पा बनसोडे, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार माधवराव बोथिकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोलिस निरीक्षक विलास गोबाडे तसेच पं.स.माजी सदस्य हिराजी भोसले, डॉ हरिभाऊ पाटील, डॉ.विनय वाघमारे,मा.नगराध्यक्ष साहेब कदम, नगरसेवक श्याम कदम, मा.नगरसेवक गजानन हिवरे,राजुअण्णा एकलारे,शंकर गलांडे, विकास वैजवाडे, मुन्ना भैय्या राठोड,रवि जैस्वाल,प्रा. गोविंद कदम, मनोज उबाळे, बालाजी वैद्य, गोविंद सोलव, रमेश ठाकूर, शिवराम भंगे, विलास ठाकूर जिवन बरीदे,श्याम अजमेरा आदीं मान्यवर उपस्थित राहणार आहेत.इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रावणाच्या महाकाय प्रतिमेच्या निर्मितीसाठी हिंगोलीचे कारागीर नंदु बंबरुळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील चार दिवसांपासून काम सुरू केले आहे. तर भव्य आतषबाजीसाठी बीड जिल्ह्यातील शाकेर भाई आणि त्यांची टीम सज्ज झाली आहे. तब्बल १०० प्रकारच्या फटाक्यांचा वापर यावेळी करण्यात येणार असून, कार्यक्रमासाठी मोठे व्यासपीठही उभारले जात आहे.कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजे संभाजी नवरात्र महोत्सव समितीचे स्वयंसेवक कार्यकर्ते तयारीत गुंतले आहेत. गर्दी लक्षात घेऊन मैदान परिसरात बॅरिकेड्स लावण्यात येणार असून, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनीही विशेष पाहणी केली आहे.शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य संयोजक मुंजाभाऊ कदम यांनी केले आहे.

You cannot copy content of this page