पूर्णा पालिकेवर भा.ज.पाची सत्ता आणण्यासाठी एकजुटीने कामाला लागा

Spread the love

परभणी लोकसभा प्रभारी मा.आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा विश्‍वास

परभणी ता.२१(प्रतिनिधी)पूर्णा नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकवूया असा संकल्प भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीच्या पूर्णा शहर व तालुक्याच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने पूर्णा बाजार समितीच्या सभागृहात रविवारी व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी माजी आमदार बोर्डीकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.जिल्हाध्यक्ष सुरेश भूमरे,तालुका अध्यक्ष संजय मोहीते, शहराध्यक्ष गोविंद ठाकर, बाळासाहेब कदम,डॉ.अजय ठाकूर,विनय कराड, बळीराम कदम,विजय कराड,सभापती बालाजी खैरे,नारायणराव पिसाळ,बालाजी रुद्रवार, लक्ष्मणराव बोबडे, आनंद(बंडू) बनसोडे यांच्यासह अन्य स्थानिक पातळीवरील नेते व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार बोर्डीकर यांनी राज्य व केंद्र सरकारच्या अनेक लोकप्रिय योजना सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्यासाठी कार्यकर्त्यांनी जागरुक असले पाहिजे तरच या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावनी होईल, असा विश्‍वास बोर्डीकर यांनी व्यक्त केला. दरम्यान,शहर व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली.कार्यक्रमाचे आभार शहराध्यक्ष गोविंद ठाकर यांनी मानले.

You cannot copy content of this page