पूर्णेत २२ व्या धम्मपरिषदेचे थाटात उद्घाटन;देश विदेशातील भिख्खूंसंघ,पालकमंत्री बोर्डीकरांसह,विविध क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी
पूर्णा(प्रतिनिधी )/१ फेब्रुवारी
येथील बुद्ध विहाराच्या प्रांगणात डॉ.बी.आर आंबेडकर स्मारक समिती व बुद्ध विहार समितीच्या वतीने पूर्णेत दोन दिवसीय २२ व्या बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन दक्षिण कोरिया येथील बुद्धिष्ठ कोरियन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.लीची रॅन यांच्या हस्ते पार पडले.प्रसंगी अध्यक्षस्थानी लेह लडाख येथील भदंत संघसेना महाथेरो, मंचावर दक्षिण कोरियाचे भदंत थेर इन चांग व्यु, स्टॅझिन जॉय लेह लडाख बॉलीवूड अभिनेता, गायक फोन्सोक लडाखी ,लेह लडाख भदंत करुणानंद महाथेरो, भदंत प्रा.डॉ.यश काश्यपायन महाथेरो, भन्ते शरणानंद महाथेरो, भन्ते डॉ.इंदवेश महाथेरो, भन्ते ज्ञानरक्षित थेरो ,भन्ते पयानंद थेरो, भन्ते बोधीधम्मा, भन्ते पंयाबोधी थेरो, भन्ते धम्मशिल थेरो, भन्ते पंयारत थेरो, भन्ते शिलरल भन्ते संघरत्न, भन्ते संघपाल ,भन्ते सुभूती थेरो, भन्ते प्रा. सत्यपाल महाथेरो, भन्ते धम्मज्योती थेरो, भन्ते धम्मबोधी, भन्ते पंयानंश, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, यांच्या सह भिख्खू संघाची उपस्थिती होती.परिषदेस प्रमुख उपस्थितांमध्ये उर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, प्राचार्य मोहन मोरे, डॉ.एसपी गायकवाड, ॲड .महेंद्र गायकवाड प्रकाश कांबळे ,उत्तम खंदारे, ॲड. हर्षवर्धन गायकवाड दादाराव पंडित,आदींची उपस्थिती होती .
सकाळच्या सत्रात धम्मपरिषदेच्या निमिताने डॉ. आंबेडकर चौक येथे फोन्सोक लडाखी यांच्या हस्ते तर आले .तर बुद्ध विहार येथे भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले.त्या नंतर बुद्ध विहारात भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांना अभिवादन करून त्रिशरण पंचशिल देण्यात आले. दुपारच्या सत्रात बुद्ध विहार येथून भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांची रथातून शहराच्या मुख्य मार्गावरून धम्म मिरवणूक काढून ह्या मिरवणूकीचे रूपांतर धम्मपरिषदे करण्यात आले.यावेळी भिक्खु संघ व श्रमणेर संघाच्या बौद्ध उपासक उपासिका च्या उपस्थित वा दयवृंद लेझीम पथक सहभागी झाले होते.
भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर व ४२ व्या स्मृति दिनाच्या निमिताने निर्वाण पदस्थ उपाली थेरो यांच्या प्रतिमांना अभिवादन करून त्रिशरण पंचशिल ग्रहण करण्यात आले .मान्यवरांचे भिक्खु संघाचे स्वागत सत्कार करण्यात आले.प्रसंगी धम्म परिषदेचे प्रस्ताविक करताना भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी परिषदेची भुमिका विशद केली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लुंबीनी स्मरणीकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बोर्डीकरांसह अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यकमाचे सुत्रसंचालन भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी केले यावेळी हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिकाची उपस्थिती होती.
जगाच्या कल्याणाची शिकवण बुद्ध धम्माने दिली–पालकमंत्री मेघना साकोरे (बोर्डीकर)
जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी परिषदेस विशेष उपस्थिती लावली होती .त्यांनीयावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की , भारतीय संस्कृतीत बुद्ध विचारांचा मोठा वारसा आहे. जगातील अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी प्रज्ञा, शील, करुणा ही शिकवण बुद्ध धम्माने दिली. आज जगात युद्ध पेटत आहेत परंतू भारतात मात्र शांत आहे भारताला भगवान बुद्धाचे विचार आहेत. याला आपण जपले पाहिजे या विचारावर चालले पाहिजे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात महिलांना दिलेल्या अधिकार व हक्क यामुळे मी पालकमंत्री या पदावर आहे. पूर्णेच्या बुद्ध विहार व परभणी जिल्हयातील बौद्ध विहाराच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न शिलराहिल असं त्यांनी बोलताना सांगितले.