‘स्वा.रा.तीर्थ’ मराठवाडा विद्यापीठाकडून परभणीच्या कृषीभूषण कांतरावकाकांना जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर

Spread the love

‘स्वारातीम’विद्यापीठाकडून परभणीच्या कृषीभूषण कांतरावकाकांना जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर

परभणी(प्रतिनिधी)२५ जानेवारी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त २०२३-२४ या वर्षासाठीचे पुरस्कार वितरण समारंभ दि. ३० जानेवारी रोजी दोन सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. २०२३-२४ या वर्षीचा जीवन साधना गौरव पुरस्कार झरी (परभणी) येथील सूर्यकांतराव देशमुख (कांतराव काका झरीकर) यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ३० जानेवारी रोजी स. ११:०० वा. महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागाचे कॅबिनेट मंत्री मा.ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे असणार आहेत. असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांनी कळविले आहे.
कांतराव काका झरीकर यांना महाराष्ट्र शासनाने कृषी-भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी कृषी, जलसंधारण, कृषीपूरक उद्योग क्षेत्रात विविध प्रयोग करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. तसेच त्यांनी सामाजिक, जांभुळभेट संवर्धन, एक गाव-एक स्वच्छ सुंदर स्मशानभूमी चळवळीची पायाभरणीकरित सामाजिक योगदान दिलेले आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन विद्यापीठाने त्यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार २०२३-२४ देण्याचे जाहीर केले आहे. असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

You cannot copy content of this page