अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करा-शिवसेना (उबाठा)ची मागणी
पुर्णेत शिवसेनेचे ता.प्र.काशिनाथ काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिलं तहसीलदारांना निवेदन
पुर्णा,ता.१६ (प्रतिनिधी) मागील आठवडाभर सुरू असलेल्या अतीवृष्टीच्या पावसामुळे पूर्णा तालुक्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शिवसेना (उबाढा)पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. पक्षाचे तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता.१६) रोजी येथिल तहसीलदार माधवराव बोथिकर यांना निवेदन दिले आहे.
पुर्णा तालुक्यात १६ आॅगस्ट पासून दोन ते तीन वेळा अतीवृष्टीचा पाऊस कोसळला.तर मागील पाच ते सहा दिवसांत पावसाने तालुक्यातील सर्वच महसुली मंडळात हाहाकार उडवून दिला आहे.मागील १० वर्षात प्रथमच सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.यामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामातीलसोयाबीन, कापूस,मुग, उडीद तुर, ऊस, केळी या प्रमुख पिक पाण्याखाली गेली आहेत.तसैच जनावरांचेही बळी गेले असून, जमिनी देखील खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.

तालुक्यातील नद्या व नाले ओसंडून वाहत असून धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामीण भागातही अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून ५० हजारांची नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी निवेदनात नमूद केली आहे.
निवेदनावर, तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे, यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते सुधाकर खराटे, दशरथ भोसले, मुंजा भाऊ कदम संतोष एकलारे, शामराव कदम,पिंटू काळे, आदीं मान्यवरांसह बंडू आप्पा बनसोडे, सुदाम ढोणे, पुंडलिक मोरे,रमेश ठाकूर,सुदामराव डोईफोडे, गोविंद सोलव, बालाजी वैद्य, बालाजी पिसाळ, माणिकराव हजारे, गणपत शिंदे,भागवतराव काळबांडे, बालाजी काळबांडे,सुरेश मगरे, पुंडलिक मोरे, गजानन शिराळे, अनिल नरवटे, हरी वाघ, अच्युतराव पारवे,शरद कदम,संजय कदम,विजय लिंगायत यांच्या सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.












