तुटलेल्या विद्युत वाहिनीने घेतला एकनाथ शिंदेंचा बळी.!
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शिंदे कुटुंबावर कोसळला काळाचा डोंगर; अभियंत्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
पुर्णा ता.७(प्रतिनिधी): Parbhani Purna News तालुक्यातील मौजे बलसा (बु) शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली असून, महावितरणची बेपर्वाई ३० वर्षीयEknath Shinde एकनाथ शिंदें या शेतकऱ्याच्या जिवावर उठली आहे. तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.सदरील घटना ही रविवारी (ता.७) सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी ताडकळस पोलीसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पुर्णा तालुक्यातील मौजे बलसा( बु.)शिवारातील गट क्रमांक १६६ शेतात मध्ये शेतकरी एकनाथ शिंदें यांची शेती आहे.रविवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या शेतातील विद्युत वाहिनी तुटून पडली होती.नेहमीप्रमाणे शेतात आलेल्या एकनाथ यास तुटलेल्या वाहिनीवर पाय पडून स्पर्श होताच शिंदे यांना जोरदार विद्युत धक्का बसला.प्रंसंगावधान राखत परिसरातील शेतकऱ्यांनी कुटुंबीयांनी त्यास तातडीने परभणी येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु दुर्दैवाने त्याचा जीव गेला असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर काळाचा डोंगर कोसळला आहे. मयताच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आहे.या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.घटना घडल्यानंतर महावितरण कंपनीचा एकही अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहचला नसल्याने त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
महावितरणने दाद न दिल्याने घडली घटना
पुर्णा शहर व ग्रामीण भागातील अनेक शिवारात तुटलेल्या वीजवाहिन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मागील तीन ते चार महिन्यांत जीर्ण होत असलेल्या वीज वाहिन्या ठिक ठिकाणी कमी अधिक १०० ते १५० प्रमाणात तुटल्याचे प्रसंग घडले.अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या परंतु महावितरणकडून कोणत्याही प्रकारची दाद दिली गेली नाही.
मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
परभणी व पुर्णा महावितरणच्या जबाबदार अधीकारी अभियंते यांच्या निष्काळजीपणाचा फटका आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे.ही बाब या घटनेतून पुन्हा अधोरे खित झाली आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या महावितरणच्या हलगर्जी अधिका-यांच्या कारभाराची तात्काळ चौकशी करून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.












