Parbhani घरावर वीज कोसळली; १ महिला गंभीर जखमी.

Spread the love

पुर्णा तालुक्यातील वझुर येथे भीषण घटना

पुर्णा, ता. २२ (प्रतिनिधी)Parbhani wazur lightning News तालुक्यातील मौजे वझुर येथे सोमवारी (दि.२२) दुपारी अचानक वीज कोसळून मोठी दुर्घटना घडली. कचरे यांच्या घरावर वीज कोसळल्याने घरात असलेली अनुसया भारत कचरे (वय अंदाजे ४०) गंभीर जखमी झाल्या आहेत.सुमारे दुपारी ३:४० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.       
सोमवारी दुपारी वादळ वा-यासह अचानक आलेल्या पावसासोबत गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू असताना वीज थेट कचरे यांच्या घरावर कोसळली. या घटनेत घराचा काही भाग नुकसानग्रस्त झाला असून घरात असलेल्या अनुसया कचरे गंभीर जखमी झाल्या.स्थानिकांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना बाहेर काढले व प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये विजेच्या कडकडाटाबाबत घबराट पसरली आहे. पावसाळ्यात सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

You cannot copy content of this page