रेल्वे प्रवासात महीलेची बॅग पळवली; सोन्याच्या दागीन्यासह ८० हजारांचा मुद्देमाल लंपास

Spread the love

परभणी रेल्वे स्थानकावर उभ्या साईनगर शिर्डी एक्सप्रेस मधील प्रकार

परभणी(प्रतिनिधी)

रेल्वेत प्रवास करणाऱ्या एका महीलेची बॅग अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना परभणी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या साईनगर शिर्डी एक्सप्रेस मध्ये घडली आहे.घटनेत महीलेने बॅग मध्ये ठेवलेली सोन्याचे दागिने तसेच रोकड असा ८१ हजार ५००  रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
      नांदेड येथून मनमाड,तसेच परळी कडे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांतील सुरक्षेचा ऐरणीवर आला असून, दररोजच मारहाण ,चैन स्मचिंग ,बॅगा पळवणे,महीलांची छेडछाड असे अनेक प्रकार घडत आहेत.असाच एक प्रकार साईनगर शिर्डी या रेल्वेने प्रवास करत असलेल्या अरुणा कुमारी या महीले सोबत घडला आहे.
पहाटेच्या दरम्यान महिलेला झोप लागली. याचाच फायदा घेत अनोळखीने महिलेजवळील बॅग लंपास केली. या बॅगमध्ये ८० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन आणि रोख दिड हजार रुपये होते. चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने तक्रार दाखल केली. सदरचे प्रकरण परभणी रेल्वे स्थानकावरील असल्याने लोहमार्ग पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे

You cannot copy content of this page