Parbhaniमहसुल दिनी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव
पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, जिल्हाधिकारी गावडे,पोलिस अधीक्षक परदेशी यांची उपस्थिती
परभणी ता.१(प्रतिनिधी)महसूल दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात (Parbhani Vasantrao Naik Marathwada Krushi Vidyapeeth) आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सह जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, अनिता भालेराव, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जीवराज डापकर, संगीता चव्हाण, शैलेश लाहोटी, आदींसह महसूल विभागाचे अधिकारी, कमर्चारी उपस्थित होते.यावेळी महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, महसूल विभागामार्फत १ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांसाठी विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आपल्या जिल्ह्यात हा सप्ताह प्रभावीपणे राबवून सर्वसामान्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. या उपक्रमात आपल्या परभणी जिल्ह्याला विकासात अग्रेसर करुयात. कर्मचाऱ्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत शासनाचे लोककल्याणकारी उपक्रम पोहोचवून त्यांना योजनांचा लाभ द्यावा. , असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.जिल्हाधिकरी रघुनाथ गावडे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा देत महसूल सप्ताह यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले. श्रीमती ढालकरी यांनी प्रास्ताविकात जिल्हा प्रशासनाने मागील वर्षात केलेल्या यशस्वी कामांचा लेखाजोखा मांडला व महसूल सप्ताहात आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.












