Parbhani पुराच्या पाण्यात पुलावरून दुचाकी चालवणे पडले महागात;दोघे वाहून गेल्याची घटना
सेलू तालुक्यातील राजेवाडी येथिल दुर्देवी घटना;प्रशासनाची शोध मोहिम सुरु
परभणी/सेलु,ता.१९(प्रतिनिधी);Parbhani Dudhana River Bridge जिल्ह्यातील लोअर दुधना सिंचन प्रकल्पातून दुधना नदीच्या पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दुधना नदी दुथडी भरून वाहत आहेत.सेलु तालुक्यातील राजेवाडी येथील नदीच्या पुलावरील पुराच्या पाण्यात मंगळवारी (ता.१९) दुपारी २ दुचाकीस्वार वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.दोघांच्या शोधासाठी प्रशासनाने युध्द पातळीवर मोहिम आखून शोध सुरु केला आहे.
छब्बुराव शिवराम जावळे (वय ५०) रा. गुळखंड ता. सेलू व मारोती रामभाऊ हरकळ (वय ४५), रा. वालूर ता. सेलू) अशी पुरात वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत.Riding a bike over a Rajewadi bridge in flood water is expensive;The incident under selu tahsil या बाबत अधिक माहिती अशी की,दुधना नदीवरील लोअर दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे. त्याचा परिणाम लोअर दुधना प्रकल्पाच्या दोन दरवाज्यातून दुधना पात्रात पाणी सोडल्या जात आहे. त्यामुळे दुधना नदी दुथडी भरुन वाहत आहे. या पाण्याने दुधनेस पुरही आला आहे. सेलू तालुक्यातील राजेवाडी शिवारातील दुधना नदीच्या पुलावरुन पाणी वाहत आहे. मंगळवारी दुपारी या पुलावरील पाण्यातून मोटारसायकलवरील दोघांनी पलिकडील काठ गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाण्याच्या धोकादायक प्रवाहाने पुल ओलांडण्याचा प्रयत्न सपशेल फोल ठरला अन् हे दोघे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने दुचाकीसह नदीपात्रात वाहून गेले. प्रत्यक्ष दर्शनींनी या मोटारसायकलस्वारांना पुलावरुन मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे, जावू नका असा धोक्याचा इशारा दिला. परंतु, मोटारसायकलस्वारांनी तो इशारा मानला नाही.अशी माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, पोलिस निरीक्षक दिपक बोरसे, पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार यांच्या सह महसूल पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापना तील पथक घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरु आहे. दरम्यान, पाण्याचा प्रवाह आणि वेग याच्यामुळे शोध कार्यात मोठे अडथळे येत असल्याची माहिती हाती आली आहे.











