Parbhani शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकार्‍यांना शेतकरी संघटनेने पिटाळून लावले

Spread the love

परभणीच्या शेंद्रा येथिल शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी


परभणी या.१९(प्रतिनिधी)तालुक्यातील शेंद्रा येथे शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या महसुल विभागाच्या अधिकार्‍यांना उपस्थित शेतकरी आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारत व घोषणाबाजी करत अधिकार्‍यांना मंगळवारी (दि.19) परत पाठविले.दरम्यान उपस्थित शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी ‘आम्ही शक्तीपीठ महामार्गा संबंधात हरकत घेतली होती ती निकाली न काढताच महामार्ग मोजणी कशी करू शकता ?’ अशी विचारणा करत मोजणीस हरकत घेतली. दरम्यान घेतलेल्या हरकती आधी निकाली काढाव्यात त्यानंतरच महामार्गाची मोजणी करावी, अशी भूमिका यावेळी उपस्थित शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली.
यावेळी किशोर ढगे, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोडे, शिवा दामोधर, प्रसाद गरुड, विठ्ठल गरुड, दिपक गरुड, कैलास गरुड, तुकाराम शिंदे, संतोष गरुड यांच्या सह मोठ्या प्रमाणात बाधित शेतकरी उपस्थित होते.

You cannot copy content of this page