परभणीतील शिवजयंतीचा उस्ताह; सर्वत्र छत्रपतींचा जयघोष मिरवणूक ठरली लक्षवेधी
परभणी(प्रतिनिधी) :
हिंदवी स्वराज्य संस्थांपक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने परभणी शहरात मोठा उत्साह दिसून आला.सर्वत्र भगवे वातावरण छत्रपतींचा जयघोष पारंपरिक सजीव देखावे, रांगोळ्या, लेझिम,झांज पथक, बँड पथक, ढोल ताशांचे पथकांने निघालेली मिरवणूक लक्षवेधी ठरली.खानापूर नाका परिसरातून बुधवारी सायंकाळी वसमत रस्त्यावरुन जल्लोषात निघालेल्या मिरवणूकीने तमाम परभणीकरांचे लक्ष वेधून घेतले.
शिवजयंती निमित्ताने वसमत रस्त्यावरील खानापूर भागातून सायंकाळी 6.30 वाजता निघालेल्या मिरवणूकीत हजारो युवक, नागरीक सहभागी झाले होते. विशेषतः छोट्या मोठ्या आकाराचे भगवे झेंडे फडकवीत निघालेल्या या युवकांचा जल्लोष वाखाणण्याजोगा होता. भगवे फेटे व गळ्यात भगवे रुमाल परिधान केलेल्या या युवकांनी जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, मॉ साहेब जिजाऊ की जय असा जयघोष केला. त्यामुळे खानापूर नाक्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतचा वसमत रस्ता या जयघोषाणे दणाणला. रात्री उशीरा ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचली.
या मिरवणूकीत सहभागी छोट्या वारकर्यांसह वारकर्यांनी टाळ आणि मृदुंगाच्या तालावर सुंदर अशी भजने, भक्तीगीते सादर केली. तर पारंपारिक वेशभूषेतील वासूदेव, गोंधळी यांनीही पारंपारिक गीते सादर करीत शिवभक्तांचे लक्ष वेधून घेतले. या मिरवणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे ढोल पथक ठरले. या ढोल पथकातील कलावंतांनी सुंदर अशी प्रात्यक्षिके सादर केले. त्यामुळे शिवभक्त भाराहून गेले. या मिरवणूकीतील रथही लक्षवेधी ठरला. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि प्रतिमेच्या अभिवादनाकरीता शिवभक्तांची मोठी गर्दी उसळली होती.
या मिरवणूकीत सहभागी शिवभक्तांनी शौर्य गीतांवर सुंदर अशी नृत्य सादर केली. या शिवभक्तांचा जल्लोष अक्षरशः वाखाणण्या जोगा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसर दणाणून सोडला. शिवजयंती निमित्त निघालेल्या या मिरवणूकीने, त्या मिरवणूकीतील आकर्षणाने परभणीकर भाराहून गेले. मिरवणूकीच्या यशस्वीतेकरीता शेकडो पदाधिकार्यांसह शिवभक्तांनी अथक असे परिश्रम घेतले.