Parbhani Sports News:जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयाचे यश
पूर्णा ता.२८(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने (ता.२८) गुरुवार रोजी घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयातील १२वी विज्ञान शाखेत शिकत असलेला विद्यार्थी शुभम रमेश असोरे याने विजय संपादन केला असून विजयी खेळाडूची शालेय विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. विजयी खेळाडूचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद अण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम, सहसचिव गोविंदराव कदम, प्राचार्य डॉ. के . राजकुमार, उपप्राचार्य डॉ शिवसांब कापसे, व डॉ गजानन कुरुंदकर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी खेळाडूस क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांना प्रा. सतीश बरकुंटे यांचे मार्गदर्शन लाभले .