Parbhani उबाठा शिवसेनेची जोरदार निदर्शने
परभणी ता.११(प्रतिनिधी)राज्य सरकारमधील भ्रष्ट परभणीमंत्र्यांची हाकालपट्टी करावी, या मागणीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आज सोमवारी (दि.११) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेधाचे फलक यावेळी आंदोलनकर्त्यांनी सोबत आणले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविंद्र रामकिशन धर्मे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेल्या या निदर्शनात शेकडो शिवसैनिक व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या सहभागी झाल्य होत्या.या आंदोलनकर्त्यांनी आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी करीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. सरकारमधील कलंकित व भ्रष्ट मंत्री हे बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकर्यांसह नागरीकांच्या भावनांना ठेच पोहोचते आहे. अशा मंत्र्यांविरुद्ध सातत्याने आवाज उठवूनही या मंत्र्यांच्या विरोधात काडीमात्र कारवाई होत नाही अशी भावना व्यक्त करत शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना यावेळी निवेदन सादर केले. या आंदोलनात जिल्हा प्रमुख रविंद्र धर्मे,मा.जि.प्र. गगंगाप्रसाद आणेराव, रामनाना खराबे, पंढरीनाथ घुले पाटील, अंबिका डहाळे, दशरथ भोसले, काशिनाथ काळबांडे, अनिल जाधव,बंडुअपप्पा बनसोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी होते.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलनकर्त्यांच्या वतीने महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात जोरदार टीका करणारे फलक आणण्यात आले होते. यावेळी जन आक्रोश आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी पत्त्यांचा डावही मांडला त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.












