परभणीत वसमत रोडवरील साईबाबा बुक स्टाॅलला आग;लाखोंचे रूपयांचे नुकसान;आगीचे कारण अस्पष्ट
पालकमंत्री मेघना ताई बोर्डीकर यांची भेट
परभणी ता.२४(प्रतिनिधी):
शहरातील वसमत रोडवरील साईबाबा प्रोव्हिजन्स दुकान गुरुवारी ता.२४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पेटले. अचानक लागलेल्या या भिषण आगीत दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सदरील प्रकार हा नेमका कशामुळे घडला हे मात्र नक्की समजू शकले नाही.घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहाणी करत दुकान मालकाशी चर्चा केली.

परभणी शहरातील वसमत रोडवर व्यापारी शेटेबंधू यांचे साईबाबा प्रोव्हिजन्स हे दुकान आहे. शालेय साहित्यासह किराणा सामान दैनंदिन लागणारी सामग्री या दुकानात मिळते. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अचानक दुकानाला वरच्या मजल्यावर आग लागली.बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ उठू लागले.घटनास्थळी अग्निशमन दलात प्राचारण करण्यात आले असुन, आग आटोक्यात आणे पर्यंत आगीच लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा आहे. दरम्यान वसमत रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते सायंकाळची वेळ असल्याने त्यातच आग लागल्याचे दिसताच बघ्यांची एकच गर्दी झाली परीणामी रस्त्यावर वातुकीची मोठी कोंडी झाली होती.

वसमत रस्त्यावरील जागृती कॉलनीतील शेटे बंधू यांच्या साईबाबा प्रोव्हिजन,साईबाबा बुक डेपो या दुकानाच्या तीसर्या मजल्यावरील गोदामास गुरुवारी सायंकाळी लागलेल्या आगीत गोदामातील साहित्य जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत या दुकानदाराचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी गुरुवारी रात्री घटनास्थळी भेट दिली. तेथील मदत कार्याचा आढावा घेतला. तसेच व्यापार्यांबरोबर चर्चा करीत घटनेबद्दल व नुकसानीबद्दल माहिती घेतली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भूमरे हे त्यांच्यासमवेत होते.