Parbhani जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी अंतिम प्रभाग रचना जाहीर

Spread the love

जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळावर पहा यादी

परभणी ता.२२(प्रतिनिधी): राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे सहसचिव यांच्या ता.१२जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ९ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२६ करीता प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना आज ता. २२ ऑगस्ट २०२५ रोजी परिशिष्ट ८ (अ) व ८(ब) मध्ये खालील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, परभणी कार्यालय, संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय, संबंधित तहसील कार्यालय आणि संबंधित पंचायत समितींच्या नोटीस बोर्डावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https://parbhani.gov.in वर उपलब्ध असेल, सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचे अवलोकन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page