परभणीकरां चंद्रग्रहण पाहण्याची संधी;वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात सोय.

Spread the love

परभणी ता.७/प्रतिनिधी : Parbhanikar chance to see lunar eclipse News आज रविवारी (दि. ७) परभणीकरांना खग्रास चंद्रग्रहणाचा अद्भुत नजारा अनुभवता येणार आहे. या खगोलीय घटनेचे थेट निरीक्षण करण्यासाठी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे रात्री ९ वाजता विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमस्थळी नागरिकांना टेलिस्कोपच्या साहाय्याने चंद्रग्रहण पाहण्याची अनोखी संधी मिळणार आहे.

खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी पुढीलप्रमाणे असेल

  • रात्री ९:५७ वाजता ग्रहणास सुरुवात
  • रात्री ११:०० ते १२:२३ दरम्यान खग्रास अवस्था (चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत)
  • या अवस्थेत पौर्णिमेचा चंद्र लालसर-तपकिरी रंगाचा दिसेल
  • रात्री १२:२३ पासून ग्रहण सुटण्यास सुरुवात
  • पहाटे १:२७ वाजता ग्रहण पूर्णतः संपुष्टात

परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने या दुर्मिळ खगोल निरीक्षणाचा आनंद मोठ्या संख्येने घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

You cannot copy content of this page