ना. धनंजय मुंडे यांना विक्रमी मताधिंक्यांनी विजयी करा-जनिमियाँ कुरेशी

Spread the love

ना. धनंजय मुंडे यांना विक्रमी मताधिंक्यांनी विजयी करा-जनिमियाँ कुरेशी

जनिमियाँ कुरेशी यांचा डोअर टु डोअर प्रचार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
परळी विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना शिंदेगट , व मित्र पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार ना. धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ पंचायत समिती उपसभापती जनिमियाँ कुरेशी यांनी सिरसाळा परिसरात डोअर टु डोअर प्रचार करुन प्रचार फेरी काढण्यात आली. महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना विक्रमी मताधिक्यांनी विजयी करा असे आवाहनही जनिमियाँ कुरेशी यांनी केले.
महायुतीचे परळी विधानसभेचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ सिरसाळा परिसर जनिमियाँ कुरेशी व सहकार्यानी पिजून काढला व परळी मतदारसंघात विकासाची गंगा वाहती ठेवण्यासाठी धनंजय मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले. धनंजय मुंडे हे विकासाची दूरदृष्टी असलेले नेते आहेत. धनंजय मुंडे हे आपल्या हक्काचे व्यक्तिमत्त्व आहे. इथल्या प्रत्येक घटकांच्या प्रगतीसाठी ते अहोरात्र झटत असतात. त्यामुळे त्यांना निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाची संपूर्ण जबाबदारी सुद्धा धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. विकास हित आपली जात आणि सेवा हाच आपला धर्म मानून मुडे साहेब गेल्या अनेक वर्ष मतदारसंघात विकासाची एक एक वीट रचत आहेत. रस्ते नाल्या ऊन बंधारे सभागृहे याचबरोबर शेतीचा शाश्वत विकास हा त्यांचा ध्यास आहे. शेकडो शेततळे, सिंचन विहिरी त्याचबरोबर बंधाऱ्यांचे जाळे निर्माण करून मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आपण जलमय केल्याने बारमाही शेतीचे प्रमाण वाढले असून त्याचा परिणाम शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यात नक्कीच झाला आहे. या भागातील विकासाचा उर्वरित अनुशेष भरून काढण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या सोबत खंबीरपणे उभेराहून विजयी करावे असे आवाहन केले आहे. राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे विकासपुरुष ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा धनंजय मुंडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन जनिमियाँ कुरेशी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page