परभणी येथील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ शुक्रवारी परळी बंदची हाक

Spread the love

परभणी येथील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ शुक्रवारी परळी बंदची हाक

सर्व पक्षीय,व्यापारी,आंबेडकर अनुयायीनी पुकारला बंद

परळी प्रतिनिधी परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया जवळ भारतीय संविधान पुस्तेकीची प्रतिकृती साकारण्यात आली होती या संविधान पुस्तेकीची एका नराधमा कडुन विटंबना करण्यात आली यामुळे आम्हा भारतीयांच्या भावना दुखावल्या असुन या नराधमाला कडक शासन करण्यासाठी परळीतील सर्व पक्षीय,व्यापारी महासंघ व आंबेडकर अनुयायांच्या वतीने शुक्रवार दि.13 डिसेंबर रोजी परळी शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

आज बुधवार दि11 डिसेंबर रोजी परळीतील सर्व पक्षीय,व्यापारी महासंघ व आंबेडकर अनुयायांच्या वतीने नेते,पदाधिकारी कार्यकर्ते यांचघ व्यापक बैठक घेण्यात आली या बैठकीत परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया जवळ भारतीय संविधान पुस्तेकीची प्रतिकृती साकारण्यात आली होती या संविधान पुस्तेकीची एका नराधमा कडुन विटंबना करण्यात आली या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान याच बैठकीत परभणी येथील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ शुक्रवारी परळी बंदची हाक देण्यात आली असून या घटनेतील आरोपी ला कडक शासन करण्यासाठी जलद न्यायालयात हे प्रकरण चालवून या देशद्रोही मनोविकारी नराधमाला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अति गंभीर कडक शासन तर करावेच परंतु या घटने मागे कोणाचा विकृत मास्टर माईंड आहे का याचा ही तपास करावा या मागणी करिता शुक्रवारी परळी बंदची हाक देण्यात आली असुन याबाबतचे निवेदन सर्व पक्षीय,व्यापारी,आंबेडकर अनुयायांच्या वतिने स्वाक्षरी असलेले तहसीलदार व पोलीसांना देण्यात आले आहे.तरी परळी शहरातील सर्व व्यापरी बांधवांनी या बंद मध्ये सहभागी होऊन या देशद्रोही घटनेचा निषेध नोंदवावा असे आवाहन ही सर्व पक्षीय,व्यापारी,आंबेडकर अनुयायीनी केले आहे.

You cannot copy content of this page