खुल्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत के.जी.जी स्कुलचे यश..!
परळी /प्रतिनिधी
कै. गणपतराव गुट्टे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सोनपेठ येथे झालेल्या राज्यस्तरीय खुल्या वकृत्व स्पर्धेत आपला क्रमांक पटकावत शाळेचे नाव लौकिक केले..
जयभवानी मित्रमंडळ सोनपेठ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा-2025 राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजीत केली होती या वेळी 4 विद्यार्थ्यांनी या वेळी सहभाग नोंदवला होता त्यातील विद्यार्थी श्रीनाथ अश्रूबा फड याने व स्नेहल सोमेश्वर मुंडे या विध्यार्थ्यांनी बक्षीस मिळवले यासोबतच कु.कीर्ती फड व रिया क्षीरसागर या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला .यावेळी यश प्राप्त करणाऱ्या विदर्थ्यांना रोख बक्षीस ,ट्रॉफी व सहभागी विदर्थ्यांनी प्रमाणपत्र मिळवला . या वेळी संस्थेचे अध्यक्ष मा.माधव मुंडे सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शाळेत सत्कार करत ह्या विद्यार्थ्यांनकडून छान रित्या भाषणाची तयारी घेतल्याबद्धल आव्हाड मॅडम यांचे देखील कौतुक केले. या वेळी सर्व शिक्षक व पालकवर्ग उपस्थिती होते…