परळी पंचायत समितीच्या सभापती पदी बालाजी (पिंटू) मुंडे यांची निवड
परळी पंचायत समितीच्या सभापती पदी बालाजी (पिंटू) मुंडे यांची निवड
सामान्य कार्यकर्त्याला धनंजय मुंडे साहेबच न्याय देऊ शकतात – बालाजी (पिंटू) मुंडे
परळी (दि. 21) —- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार परळी पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या सभापतीपदी पूर्वीचे उपसभापती बालाजी (पिंटू) मुंडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आधी उपसभापती, आता सभापती पद देऊन मा. मुंडे साहेबांनी मला न्याय दिला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला ना. धनंजय मुंडे साहेबच न्याय देऊ शकतात, अशा भावना यावेळी बालाजी (पिंटू) मुंडे यांनी व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने ना. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र संपर्क कार्यालयात पिंटू मुंडे यांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला, यावेळी जि. प. गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, कृ.उ.बा.स.संचालक सूर्यभान नाना मुंडे, रा.कॉ. चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, कृ.उ.बा.स.संचालक माऊली तात्या गडदे, श्री.माऊली मुंडे, श्री.विकास बिडगर, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन मामा कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य जानिमिया कुरेशी, सौ.सुषमाताई माऊली मुंडे, सटवाजी फड, सौ. कल्पनाताई सोळंके, सौ. मीराबाई तिडके, सौ. रेखाताई शिंदे, सरपंच गोवर्धन कांदे, कांता फड, भानुदास डिघोळे, विश्वनाथ देवकते, उपसरपंच बाळासाहेब मुंडे, आदी उपस्थित होते.
परळी पंचायत समितीच्या सभापती पदावर अविश्वास ठराव संमत झाल्याने हे पद रिक्त झाले होते.
धनंजय मुंडे यांच्या हाती पंचायत समितीमध्ये एकहाती सत्ता असून, आज बालाजी (पिंटू) मुंडे यांची सभापती पदी निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांनी ना. धनंजय मुंडे साहेबांचे आभार मानले आहेत.