अतिक्रमण मुक्त करून सरस्वती व घनशी नदीचे पुनर्जीवन करुन सुशोभीकरण करण्यात यावे —मा.नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया ,
अतिक्रमण मुक्त करून सरस्वती व घनशी नदीचे पुनर्जीवन करुन सुशोभीकरण करण्यात यावे —मा.नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया ,
परळी वैजनाथ (प्रतीनिधी)÷पुरातन काळापासून प्रभु वैद्यनाथाचया पावन भुमीत असलेल्या व जुन्या गांव भागातुन वाहणाऱ्या सरस्वती व घनशी
चे पुनर्जीवन करुन सुशोभीकरण करण्यात यावे व या नदीत झालेले अतिक्रमण काढून नद्यांचा श्वास मोकळा करण्यात यावा अशी मागणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक यांच्या कडे एका निवेदनाद्वारे मा.नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केली आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून नद्यांचे पुनर्जीवन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात येत आहे . अधिकाधिक नद्यांचे पुनर्जीवन, खोलीकरण, सपाटीकरण पाञ विस्तारित करणे आदि बाबिंना प्राधान्यक्रम देण्यात येत आहे.जास्तीत जास्त नद्या उपनद्या, ओढे,नाले प्रवाही करण्यावर केंद्र व राज्य शासनाकडून भर दिला जात असताना परळीत नद्यांचे स्वरुप माञ अतिक्रमणाच्या विळख्यात सापडत आहे.या बाबींवर प्रशासक व मुख्याधिकारी यांनी तातडीने कारवाई करावी व पुरातन काळापासून असलेल्या या दोन्ही नद्यांचे पुनर्जीवन करुन सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी लोहिया यांनी केली असुन याबाबत लवकरच पशुसंवर्धन व पर्यावरण मंञी पंकजाताई गोपीनाथराव मुंडे,जिल्हाधिकारी, यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती लोहिया यांनी दिली आहे.,