जिल्ह्यातील महिलांच्या सुलभ शौचालयाच्या प्रश्नाची जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतली दखल

Spread the love

जिल्ह्यातील महिलांच्या सुलभ शौचालयाच्या प्रश्नाची जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतली दखल

सालेहा जिलानी शेख यांच्या मागणीला आले यश

बीड प्रतिनिधी. बीड जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी सुलभ शौचालय नसल्याने महिलांची होणारी गैरसोय दूर करावी व नवीन सुलभ शौचालय बांधून द्यावे अशी मागणी बीड जिल्हा समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सालेहा जिलानी शेख यांनी केली होती. महिलांना भेडसावणाऱ्या या प्रश्नाचे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तात्काळ दखल घेत जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व विविध कार्यालयांना महिलांसाठी नवीन सुलभ शौचालय बांधावीत अशा प्रकारचे लेखी आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यात तहसील कार्यालये, नगरपरिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात तसेच व्यापार पेठेत महिलांसाठी सुलभ शौचालयांचा अभाव आहे आणि जे काही मोजकेच सुलभ शौचालय उपलब्ध आहेत तेही अत्यंत नादुरुस्त झाली आहेत. तर काही ठिकाणी बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे शासकीय कामासाठी आणि बाजारपेठेत बाहेर पडणाऱ्या महिलांना मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागत होते.
महिलांच्या या प्रश्नावर समाजवादी पार्टी महाराष्ट्राच्या बीड जिल्हा महिला आघाडीचे अध्यक्षा सालेहा जिलानी शेख यांनी आवाज उठविला व बीड जिल्हाधिकाऱ्यांना या प्रश्नावर निवेदन दिले होते.सालेहा शेख यांच्या या महत्त्वपूर्ण निवेदनाची जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तात्काळ दखल घेतली. व बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद कार्यालयांना सार्वजनिक बांधकाम विभागाला व इतर शासकीय कार्यालयांना लेखी आदेश देऊन ज्या ठिकाणी महिलांसाठी सुलभ शौचालय नाहीत अशा ठिकाणी नवीन सुलभ शौचालय बांधावीत तसेच जे बंद पडले आहेत त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा निर्माण करून ते चालू करावेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ आदेश काढले नाहीत तर सुलभ शौचालयाच्या संदर्भात केलेल्या कामाचा अहवाल सुध्दा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा असेही आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे एकूणच बीड जिल्ह्यातील महिलांना भेडसावणरा हा प्रश्न सालेहा जिलानी शेख यांच्यामुळे मार्ग लागल्याचे दिसत आहे.

You cannot copy content of this page