परळीचे सुपुत्र, किरण गित्ते IAS, यांच्या योगदानाने त्रिपुराचा गौरव!

Spread the love

परळीचे सुपुत्र, किरण गित्ते IAS, यांच्या योगदानाने त्रिपुराचा गौरव!

पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्रिपुरा सुंदरी मंदिराचे उद्घाटन; गित्ते यांनी दिली प्रकल्पाची माहिती

परळी (प्रतिनिधी) : परळी वैजनाथचे नाव राज्याच्या सीमेपलीकडे पोहोचवणारे येथील सुपुत्र,मा .किरण गित्ते साहेब (IAS), यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाने त्रिपुरातील प्रसिद्ध त्रिपुरा सुंदरी मंदिराच्या नूतनीकरण झालेल्या संकुलाचे आज उद्घाटन झाले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ .माणिक सहा जी उपस्थित होते.

      हे मंदिर ५१ शक्तीपीठांपैकी एक असून, केंद्र सरकारच्या 'प्रसाद' योजनेअंतर्गत या मंदिराच्या विकासासाठी निधी देण्यात आला होता. त्रिपुराच्या पर्यटन विभागाने या प्रकल्पाच्या नियोजनात आणि कामात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याचे नेतृत्व किरण गित्ते यांनी केले.
       या प्रकल्पामुळे मंदिराच्या परिसरात ५२ कोटींहून अधिक खर्च करून अनेक आधुनिक सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. यात भाविकांसाठी मोठे हॉल, लिफ्ट आणि इतर सुविधांचा समावेश आहे. यामुळे भाविकांची सोय झाली असून, स्थानिक लोकांनाही रोजगार मिळत आहे.

आज पंतप्रधानांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन सोहळ्यात, किरण गित्ते साहेब यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंदिराच्या विकास प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या या योगदानाने त्रिपुराच्या धार्मिक आणि पर्यटन क्षेत्राला नवीन बळ मिळाले असून, आपल्या परळी वैजनाथ शहराचाही गौरव वाढला आहे.

You cannot copy content of this page