अभिनेत्री तेजा देवकर यांच्या हस्ते आज श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या दुर्गोसवाचे उद्घाटन-फुलचंदराव कराड

Spread the love

अभिनेत्री तेजा देवकर यांच्या हस्ते आज श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या दुर्गोसवाचे उद्घाटन-फुलचंदराव कराड

सौ.मोनाली व प्रदिपराव आंधळे यांच्या हस्ते दुर्गादेवीची प्रतिष्ठापना
परळी (प्रतिनिधी)
  परळीसह संपूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या दुर्गा महोत्सवाचे आज दि.२३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेत्री तेजा देवकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार असल्याची माहिती श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष,भगवान सेनेचे सरसेनापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते फुलचंदराव कराड यांनी दिली असुन संत भगवानबाबा प्रतिष्ठाणच्या दुर्गामातेची प्रतिष्ठापना फुलचंदराव कराड यांच्या कन्या सौ.मोनाली व जावाई प्रदिपराव आंधळे यांच्या हस्ते दि.२२ सप्टेंबर रोजी मोंढा मैदानावर विधीवत पुजा करुन करण्यात आली.
  गत १६ वर्षापासुन श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करुन नागरीक व दुर्गाभक्तांची वाहवा मिळविल्यानंतर यावर्षीही दुर्गोसव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.फुलचंदराव कराड यांनी जि.प.सदस्य, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, राज्य परिवहन महामंडळाचे सदस्य,महानंद मुंबईचे संचालक,दुध संघाचे अध्यक्ष, भगवानबाबा शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष या माध्यमातून जनतेची सेवा करताना असंख्य युवकांना नौकरीस लावले,यामुळेच फुलचंदराव कराड यांना नौकरीवाला बाबा म्हणुन ओळखले जाते.यावर्षी फुलचंद भाऊंनी मोंढा मैदानावरील सभामंडपात दि.२३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे यामध्ये दि.२३ रोजी एकापेक्षा एक अप्सरा लावणी,दि.२४ रोजी स्वर भक्ती आर्केष्ट्रा दि.२५ रोजी मनिषा उमरीकर प्रस्तुत खेळ मांडियेला दि.२६ रोजी शुभम मस्के प्रस्तुत भिम संगित रजनी,दि.२७ रोजी दांडिया चिल,दि.२८ रोजी कव्वाली समीर राज,दि.२९ रोजी पुनम कुडाळकर यांचा तुमच्यासाठी काही पण लावणी कार्यक्रम,दि.३० रोजी ह.भ.प.प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन,दि.१ ऑक्टोबर रोजी रामदास कदम व राजाराम बापु यांचा जागरण गोंधळ व दि.२ ऑक्टोबर रोजी रावण दहन आणि सुभाष शेप यांचा स्वररत्न आर्केष्ट्रा हे कार्यक्रम होणार असुन सर्व कार्यक्रम हे मोंढा मैदानावर दररोज सायंकाळी ७ वाजता होणार आहेत. अशी माहिती भगवान बाबा प्रतिष्ठान दुर्गोत्सव मंडळाचे सचिव शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page