परळी-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू करून रेल्वे स्थानकात सुविधा निर्माण करावी

Spread the love

परळी-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू करून रेल्वे स्थानकात सुविधा निर्माण करावी
मराठवाडा जनता विकास परिषद,परळी व रेल्वे विकास समितीची डीआरएम यांच्याकडे मागणी
परळी वैजनाथ/प्रतिनिधी
परळी -मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यासह नांदेड -पनवेल एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या प्रवाशी,स्लीपर तसेच ए.सी.बोगींची संख्या तात्काळ वाढवावी तसेच परळी मार्गे पुणे,मुंबई,नागपुर,तिरूपती,अयोध्या,वाराणसी,गोवा व ईतर प्रमुख ठिकाणासाठी त्वरीत रेल्वे सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन सिकंद्राबाद रेल्वे विभागाचे प्रबंधक डॉ.आर.गोपालकृष्णन यांना दि.23 सप्टें 25 रोजी परळी रेल्वे स्थानकात देण्यात आले.


याप्रसंगीपरळी रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष जी.एस.सौंदळे,परळी रेल्वे विकास समिती पदाधिकारी श्री.कैलास तांदळे,श्री.विलास ताटे व मराठवाडा जनता विकास परिषदेच्या परळी शाखेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक चेतन सौंदळे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
नांदेडहुन मुंबईला जाणा-या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे कनेक्शन मिळावे म्हणून परळी येथून पहाटे निघणा-या परळी- आदिलाबाद या पॅसेंजर रेल्वेची वेळ बदलावी तसेच प्रवासी जनतेच्या व्यापक हिताच्या दृष्टीने पुढील महत्वपूर्ण मागण्या देखील निवेदनात करण्यात आल्या आहेत.
1)मछलीपट्टणम -बीदर, सिकंद्राबाद-बीदर इंटरसिटी एक्सप्रेस,पाटणा-पूर्णा,रायचूर-परभणी ईत्यादी रेल्वे सेवा परळी-वैजनाथ पर्यंत त्वरीत विस्तारीत करावी.
2)दसरा-दिवाळी सणानिमित्त परळी-वैजनाथ ते सिकंदराबाद,छ.संभाजीनगर,मुंबई,पुणे,नागपुर व ईतर ठिकाणी विशेष रेल्वे सेवा सुरू करावी.
3) ‘पूर्णा-परळी’ रेल्वे परत जाताना बहुअंशी रिकामीच असते त्या ऐवजी ती लातूर- कुर्डवाडी किंवा उदगीर-बीदर पर्यंत विस्तारित करावी.
4)अमरावती -पुणे व कोल्हापुर नागपुर रेल्वे नियमित कराव्यात
5)क्राॅसिंगच्या निमित्ताने घाटनांदूर,वडगाव (निळा) इत्यादी स्टेशन वर विविध गाड्या विनाकारण अधिक वेळ खोळंबून ठेवू नयेत,परळी रेल्वे स्थानकातील आरक्षण कार्यालयाची कामाची वेळ वाढवावी.
6)प्रवाशांच्या अधिक सुरक्षाकरिता आरपीएफ व जीआरपी पोलीस संख्या वाढवून संबंधित विभागाचे वरीष्ठ कार्यालय तात्काळ निर्माण करावे
7)रेल्वे स्टेशन व परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरा व रेल्वे डब्ब्यांचे डिस्पले चालू ठेवणे
यासह ईतर मागण्या करण्यात आल्या यावेळी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष जी.एस.सौंदळे,परळी रेल्वे विकास समितीचे प्रमुख पदाधिकारी कैलास तांदळे,विलास ताटे,माजी नगरसेवक चेतन सौंदळे,अॅड.मनोज संकाये,ज्ञानोबा अघाव,प्रा.सत्यनारायण डूबे,सुधीर फुलारी,अॅड.अरूण पाठक,अनंत इंगळे,योगेश पांडकर,सूर्यप्रकाश तुसाम,अॅड.के.बी.फड,आर.जी.स्वामी,संदीप तिळकरी,अॅड.एस.व्ही.केंद्रे,सुनील फुलारी,गिरीष भोसले,जयराम गोंडे,ब्रम्हनाथ कांबळे,ज्ञानेश मातेकर,रमेश मस्के,शेख अल्ताब,इंद्रसेन वाल्मिकी,दीपक सिरसाट,आदिंची उपस्थिती होती.परळी मार्गे विविध ठिकाणी रेल्वे सुरू करणे तसेच पिट लाईन यंत्रणा व रेल्वे स्थानकात अद्यावत सुविधा निर्माण करण्याचे काम रेल्वे विभागामार्फत करण्याचे सकारात्मक प्रतिसाद डीआरएम डॉ.आर.गोपालकृष्णन यांनी शिष्टमंडळास दिला आहे.

You cannot copy content of this page