परळी पत्रकार भवन येथे स्व: बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
परळी पत्रकार भवन येथे स्व: बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
परळी (प्रतिनिधी) :
लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन परळी येथे दि.२३ जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी न.प.सभापती गंगासागर शिंदे यांनी पत्रकार भावनासाठी गादी व लोड देण्याचे जाहीर केले. तसेच शिवाजीराव शिंदे यांनी भवनास सतरंजी देण्याचे जाहीर केले. संपादक प्रकाश सूर्यकर, प्रेमनाथ कदम, ता.अध्यक्ष बाबा शेख, शहराध्यक्ष कंडूकटले, भगीरथ बद्दर, संतोष जुजगर, कैलास डुमणे, काशिनाथ घुगे, भगवान साकसमुद्रे, वसंत मुंडे, व्यंकटेश शिंदे, तसेच अभयकुमार ठक्कर, रवींद्र परदेशी, भोजराज पालीवाल, चोंडे, विभुते, अतुल दुबे आदी दिसत आहेत.