मूकनायकचा आदर्श घेऊन पत्रकारांनी अन्यायाविरुद्ध लेखणी चालवावी – प्रा.प्रविण फुटके
मूकनायकचा आदर्श घेऊन पत्रकारांनी अन्यायाविरुद्ध लेखणी चालवावी – प्रा.प्रविण फुटके
परळी (प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकाच्या माध्यमातून शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडली. आज हा आदर्श घेऊन पत्रकारांनी आपली लेखणी चालवून अन्याविरुद्ध आवाज उठवावा असे प्रतिपादन प्रा.प्रविण फुटके यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रत्रकार भवन परळी वै. येथे दि.३१ जानेवारी २०२१ रोजी आयोजित मूकनायक शताब्धी समारोह कार्यक्रमाप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी दै.लोकशाचे पत्रकार दिलीप बद्दर होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध विचारवंत लक्ष्मण वैराळ व दै.सकाळचे प्रा.प्रविण फुटके उपस्थित होते.
यावेळी लक्ष्मण वैराळ यांनी भारतातील वर्तमानपत्रांचा इतिहास सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकोपयोगी पत्रकारितेवर प्रकाश टाकला. मराठीतील आद्य वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकरांचे दर्पण मानले जाते परंतु हे वर्तमानपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु झाले त्यापूर्वीच १८२८ साली मुंबापुर वर्तमान हे मराठी पत्र सुरु होते. याची जाहिरात बॉंबे गॅझेट आणि बॉंबे करिअर्सच्या अंकात मिळते. असे सांगून पत्रकार हा समाजाचा दिग्दर्शक असतो आपल्या लेखणीतून पत्रकारांनी नवसमाज घडवण्याचे कार्य करावे असे ते म्हणाले.
यावेळी स्पर्धा परीक्षेद्वारे एस.बी.आय. बँकेत निवड झाल्याबद्दल दै.दिव्य अग्नी चे संपादक प्रकाश सूर्यकर यांनी जयपाल कांबळे यांचा सत्कार केला.
परळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बाबा शेख दैनिक जंग
कंडुकातले शहराध्यक्ष(लोकप्रभा), दै.सम्राटचे रानबा गायकवाड, दै.सूर्योदयचे प्रेमनाथ कदम, दै.सिटीझनचे शेख मुकरम,बीड नेताचे बालाजी ढगे, कांशीनाथ घुगे, ब्रम्हानंद कांबळे, प्रा.दशरथ रोडे, आनंद नगरीचे माणिक कोकाटे, नवल वर्मा(महासमाचार), भारतीय बौद्ध महासभेचे सचिन रणखांबे, आकाश देवरे, ऍड.कपिल चिंडालीया, तिडके, गुट्टे, दै.महाभारतचे विकास वाघमारे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रानबा गायकवाड यांनी केले तर सुत्रसंचलन भगवान साकसमुद्रे यांनी केले व उपस्थितांचे आभार दै.दिव्य अग्नी चे संपादक प्रकाश सूर्यकर यांनी मानले.