राममंदिर ते राष्ट्रमंदिर निर्माण अभियान यशस्वी करण्यासाठी गावभागातील रामभक्त सज्ज
राममंदिर ते राष्ट्रमंदिर निर्माण अभियान यशस्वी करण्यासाठी गावभागातील रामभक्त सज्ज
परळी वैजनाथ :- संपुर्ण भारतामध्ये श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी समर्पण अभियान आयोध्या अंतर्गत शहरातील गांव भागामध्ये व्यापक बैठक घेण्यात आली.या वेळी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत संपुर्ण भारतामध्ये हे निधी संकलन अभियान राबवले जाणार असून हे अभियान आपल्या भागामध्ये शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी श्री दत्तमंदिर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये तालुका अभियानात समितीतर्फे योग्य त्या सूचना देण्यात आल्या यामध्ये काही ग्रुपही बनवण्यात आले या बैठकीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्व बीड जिल्हा कार्यवाह श्री राकेश जी मोरे तसेच विश्व हिंदू परिषद बीड जिल्हा समन्वय मंच प्रमुख तथा प्रखंड पालक श्री श्रीपाद कुलकर्णी , प्रखंड अध्यक्ष मा.श्री.पुरुषोत्तम गुरु जोशी, तालुका अभियान प्रमुख तथा शहर कार्यवाह दिनेश लोंढे, श्री रामचंद्र गोस्वामी, प्रखंड मंत्री श्री.शैलेश चुन्नीलाल पांडे, क्षेत्रउपाध्याय श्री राजेंद्र दगडगुंडे, प्रखंड सहमंत्री श्री रमेश गायकवाड, राष्ट्र सेविका समिती शहर कार्यवाहीका सौ.शोभाताई कुलकर्णी,पञकार अनंत कुलकर्णी, राष्ट्र सेविका समिती परळी शहर निधी प्रमुख डॉ सौ विनाताई पारगांवकर, प्रखंड उपाध्यक्ष मा , सौ.अरूणाताई परळीकर,शुभम ठाकुर, शिवराज ठाकूर, दताञ्य गोस्वामी, स्मिता कुलकर्णी, शुभम पानपट, कु. रागिनी साखरे, पूजाताई जोशी, नवल वर्मा, श्रीकांत गंभीरे, जयतीर्थ गद्रे, शुभम कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, गोविंद जोशी ईत्यादी उपस्थित होते. या वेळी अभियानाची पुढील रूपरेषा ठरवण्यात आली आहे.