आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरूवात शाळेतील 25 टक्के मोफत प्रवेशासाठी पालकांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत- डॉ.संतोष मुंडे
आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरूवात शाळेतील 25 टक्के मोफत प्रवेशासाठी पालकांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत- डॉ.संतोष मुंडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 (आरटीई) अंतर्गत समाजातील दुर्बल व वंचीत घटकांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेमध्ये 25 टक्के जागा राखिव ठेवणे बंधनकारक आहे. या 25 टक्के जागांवर दुर्बल व वंचीत घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा या साठी बुधवार 03 मार्च पासुन ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी जिल्हयातील व तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत असे अवाहान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत कायम विनाअनुदानित, विना अनुदानित व स्वंयअर्थसहाय्यीत शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांसाठी सन 2021-2022 करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 3 मार्चपासून सुरू झाली आहे. आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती आरटीई च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.पालकांनी २१ मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. आवश्यक कागदपत्रे व इतर माहिती https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असून पालकांना 21 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा.असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच शासनाने शिक्षणापासुन मुले वंचीत राहु नये गरिबा मुलांना देखील अद्यावत व गुणवत्तापूर्वक इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे श्रीमंतांच्या मुलांबरोबर गरिब मुलांना सुध्दा इंग्रजी शाळेत शिकता यावे या साठी शासनाने हि योजना सुरू केली आहे.
या मोफत प्रवेशापोटी फिचा परतावा शासन कराणार आहे. यातुन बीड जिल्हयातील पालकांचे कोटयावधी रूपये वाचणार आहेत. अशा महत्वपूर्ण व आपल्या पाल्याचे भविष्य घडविण्यासाठी या योजनेचा लाभ पालकांनी घेतला पाहिजे. या योजनेस पात्र पालकांनी जागृतपणे या योजनेतील माहिती घेवुन मुदतीच्या आत आपल्या पाल्याचे प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरुन घ्यावा तसेच आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशाची संधी ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील गोर – गरीब विद्यार्थ्यांसाठी आहे. फॉर्म भरण्याची मुदत दि.३ मार्च २०२१ ते २१ मार्च २०२१,- आर.टी.ई.अंतर्गत तुमच्या पाल्याला शाळेत मोफत प्रवेश (कुठलेही शुल्क नाही),• खुल्या वर्गातील वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे., अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), भटक्या जमाती (NT) व इतर मागास वर्ग (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC), एस.ई.बी.सी.या प्रवर्गासाठी जातीचा दाखला अनिवार्य (उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही), अँडमीशन सिटप्रमाणे उपलब्ध होतील, याची पालकांनी नोंद घ्यावी., आर.टी.ई. शिक्षण कायद्याअंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक घटकांसाठी यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे रहिवासी पुरावा : आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीज बील यांपैकी एक, पाल्याचा जन्म दाखला, पाल्याचा पासपोर्ट साईज रंगीत फोटो, पालकांचा जातीचा दाखला (ST, ST, NT, OBC, SBC), खुल्या वर्गांसाठी १ लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला तसेच तरी जास्तीत जास्त गरजू गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत असे अवाहान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.