हॉटेल, पान टपरी, छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी -संजय गवळी
हॉटेल, पान टपरी, छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी -संजय गवळी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहरातील हॉटेल व्यवसायिक पान टपरी छोटे छोटे उद्योग व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्यांना या जाचक अटीतुन बाहेर काढून त्यांना इतर व्यापाऱ्यांन प्रमाणे सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी अगोदरच गेल्या वर्षींच्या लॉकडॉऊन मुळे छोट्या व्यवसायिकांची व कामगारांची कंबरडे मोडले आहे त्यात आपण छोट्या व्यावसायिकांसाठी जाचक अटी टाकून त्यांच्या समस्यात आणखीन वाढ केली आहे तरीही माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी हॉटेल पान टपरी छोट्या व्यवसाय करणाऱ्यांना सोशल डिस्टन्स चे नियम पाळून त्यांना इतर व्यापान्यांन प्रमाणे सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी आपल्या कार्यालयाकडून मिळावी तसेच लग्न समारंभासाठी नियम व अटी लाऊन मंगल कार्यालय फिक्शन हॉल हे सुरू करावेत जेणेकरुन यांच्यावर अवलंबून असणारे कामगार यांचे हाल होणार नाहीत असे एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष संजय गवळी यांनी कळविले आहे.












